spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी: राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याना औरंगाबाद शहर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांना औरंगाबाद शहर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची १ मे रोजी सभा झाली होती. मात्र या सभेसाठी राज ठाकरेंना घालून देण्यात आलेल्या अटी-शर्तीचे उल्लंघन झाले होते. त्यामुळे याप्रकरणी औरंगाबादच्या सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी कलम ११६, कलम ११७ आणि कलम १५३ अंतर्गत राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखर करण्यात आला आहे. दाखल केलेल्या गुन्हा प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी न्यायालयात उपस्थित राहावे असे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याचा दोषारोपपत्र आता न्यायालयात दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी राज यांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांना ही नोटीस स्पीड पोस्टाने पाठवली आहे.

 

हे ही वाचा :-

मनसेचं नवे घोषवाक्य, ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’

मनसेची नवी भुमिका ‘हलाल विरोधात’

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss