spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray Live मोठी बातमी ! बंजारा समाजचे नेते अनिल राठोड यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठकरे पक्षात मोठी गळती दिसून येत होती. पण त्यांचं प्रमाणे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अनेक लोकं प्रवेश करतांना दिसत आहे. आज मत्तोश्रीमध्ये बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड आणि सहकार्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हातात शिवबंध बांधले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पत्रकार परिषदेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याच प्रमाणे बेळगावसाठी आसामला नवस करायला का जात नाही ? असा प्रश्न उपस्थित केला.

सेवालाल महाराज (Sewalal Maharaj) याचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हा घणाघाती हल्ला चढवला. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या नेमकी विषयीची याचिका दाखल करण्यात आली आहे. मला वाटतं राज्यपालांची नियुक्तीही कोणत्या निकषावर व्हावी हे ठरवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उगाच माझ्या आजूबाजूचे आहेत म्हणून कुणालाही राज्यपाल करू नये. राज्यपाल पदावर त्या दर्जाचीच लोकं पाहिजे. केवळ माझा माणूस आहे. मग तो बिनडोक असला तरी चालेल पण मी राज्यपाल म्हणून पाठवेल, असं नाही चालणार, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

महाराष्ट्र बंद (Maharashtra closed) करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आम्ही लवकरच त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. उदयनराजे (Udayanaraje) यांना मी खास धन्यवाद देईल. या मुद्द्यावर भाजपमधील सुद्धा छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. तशी सुरुवात झाली आहे. आम्ही अवधी दिला होता. चांगलं सांगून राज्यपाल जात नसेल तर महाराष्ट्र काय आहे दाखवण्याची वेळ आली आहे.

हे ही वाचा : 

नवंवर्षाच्या सुरवातीलाच राज ठाकरे यांची तोफ कोकणात धडाडणार

उदयनराजेंची आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा, ‘पुढे काय होईल ते बघून घेऊ’

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss