मोठी बातमी! अखेर संजय राऊत ईडीच्या ताब्यात…

या प्रकरणात संजय राऊतांवर मनीलॉन्ड्रिंगचा आरोप ईडीकडून करण्यात आला

मोठी बातमी! अखेर संजय राऊत ईडीच्या ताब्यात…

संजय राऊत ईडीच्या ताब्यात

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून राऊत यांची चौकशी सुरू होती. तसेच गेल्या नऊ तासांपेक्षा जास्तवेळ ईडीची ही चौकशी सुरू होती. या प्रकरणात संजय राऊतांवर मनीलॉन्ड्रिंगचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. त्याचबरोबर स्वप्ना पाटकर यांनीदेखील पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

ईडीच्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. शिवेसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. तर या कारवाईमुळे आम्ही आनंदी असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाने दिली होती. भाजपानेदेखील या कारवाईवरून संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले होते.

पण, संजय राऊतांची ईडीकडून होणारी चौकशी अखेर संपलेली आहे आणि पत्राचाळप्रकरणी संजय राऊत यांना त्यांच्या निवासस्थानावरून अटक करण्यात आली आहे.

 

Exit mobile version