मोठी बातमी! फक्त शिंदे गटच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता देखील जाणार गुवाहाटीला

अजून त्या दिसाची. झुंज वाऱ्याची. रात्र पावसाची तशी, आपले शिंदे साहेब परत ४० आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची”,

मोठी बातमी! फक्त शिंदे गटच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता देखील जाणार गुवाहाटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या सर्व ५० बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर येत असतानाच आता अजून एक आश्चर्यजनक बाब समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील गुवाहाटीला जाणार आहेत, अशी माहिती आता समोर येत आहे. याबाबत एकनाथ खडसे यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना माहिती दिलीय. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाच्या पुन्हा गुवाहाटीला जाण्यावरून चांगलीच टीका केली होती . त्यामुळे एकनाथ खडसेंच्या गुवाहाटीला जाण्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच आलंय.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजेएनटी सेलच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलत असताना खडसे यांनी ते गुवाहाटीला जात असल्याची माहिती दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले, “मी दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो. आताही मी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे, आणि परत आमचं सरकार येऊ दे, असं साकडं घालणार”. तसेच, “४० बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी आहे”, अशी खोचक टीका देखील खडसेंनी केली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी नुकतंच मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरुन काव्यमय शब्दांमध्ये टीका केली होती. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी आठवण असते तशी प्रेयसीसोबतचीही आठवण असते. भेट तुझी माझी प्रेमाची. “अजून त्या दिसाची. झुंज वाऱ्याची. रात्र पावसाची तशी, आपले शिंदे साहेब परत ४० आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची”, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली होती.

हे ही वाचा:

Veer Savarkar: जर सावरकरांच्या निमत्ताने ही चूक झाली हे लक्षात आलं असेल तर…, चंद्रकांत पाटलांचं विधान

Mantralay : मंत्रालयात ‘स्पायडरमॅन’ पद्धतीने तरुणाचे आंदोलन; न्यायासाठी प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version