spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आताची मोठी बातमी ! अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी

समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) नेते आणि खासदार अबू असीम आझमी (Abu Asim Azmi) यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats) देण्यात आली आहे. या धमकी बाबत कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेनंतर अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझं तोंड बंद होणार नाही. मी सत्य ते बोलतच राहणार, असं आझमी यांनी म्हटलं आहे. तसेच एका जिल्ह्याचं नाव काय बदलता. महाराष्ट्राचेच नाव बदला. महाराष्ट्राचे नाव संभाजी नगर (Sambhaji Nagar) ठेवा, अशी मागणीच अबू आझमी यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

औरंगजेबाबाबत अबू आझमी यांनी एक मोठं वक्तव्य केले होते. औरंगजेब बादशाह हा वाईट माणूस नव्हता, त्याचा खरा इतिहास जेव्हा समोर येईल तेव्हा हिंदू समाजही ते मान्य करेल, असं विधान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केले होते. हिंदूंवर हल्ले होत असतील तर मुस्लीमांवरही (Muslims) हल्ले होत आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे, या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

सरकारने माझी सुरक्षा कमी केलेली आहे.१९९५ पासून मला सुरक्षा होती. पण आता ती सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे. त्यात कपात करण्यात आलेली आहे. शिंदे-फडणवीस सरकारची (Shinde-Fadnavis government) जी मर्जी आहे तेच ते करतील, असंही ते म्हणाले. औरंगजेबचा बनारसच्या पंडिताच्या मुली सोबतचा जो किस्सा आहे तो जगजाहीर आहे. त्याने तिचं रक्षण केलं होतं. आपल्या शिपायाला हत्तीच्या पायदळी तुडवलं होतं. त्यामुळे हिंदूंनी बनारस येथे त्यांच्या स्मरणार्थ मस्जिद बांधलीये. औरंगजेबाने जे काही केलं ते १९४७ ला संपलं होतं. पण त्याचा राजकीय फायदा घेतला जातोय, अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे.

हे ही वाचा:

दैनिक ‘सामानाच्या’ जाहिरातीमधून शिंदे गटावर हल्लाबोल

राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी घेणार ‘हा’ मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss