नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत मोठी बातमी, तांबेंच्या विरोधात शुभांगी पाटील मैदानात

नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत मोठी बातमी, तांबेंच्या विरोधात शुभांगी पाटील मैदानात

नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) उमेदवारी मिळूनही काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. या उलट त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना भाजपची फूस असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता तांबेंच्या विरोधात शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या मैदानात उतरल्या आहेत. महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाला देण्यात आली असून शुभांगी पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी काळातील थेट तीन उमेदवारांमध्ये असणार आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पाठिंबा देण्यात आला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुरू झालेल्या या बैठकीमध्ये संजय राऊत (Sanjay Raut), सुभाष देसाई (Subhash Desai) यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीला स्वत: अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या देखील उपस्थित आहेत. नाशिक निवडणुकीत ठाकरे गटाची काय भूमिका असावी यावर या बैठकीमध्ये चर्चा सुरू होती.

तर सत्यजित तांबे यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका मंडळी आहे. सत्यजित तांबे यांनी आमच्याकडे पाठिंबा मागितलेला नाही. तांबेंकडून पाठिंब्याचा प्रस्तावर आल्यास त्यावर पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी म्हटलं आहे.जरी ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला असलं तरी मविआमधील इतर घटक पक्षदेखील त्यांना पाठिंबा देणार का? हे पहावं लागणार आहे.

हे ही वाचा:

ड्रग्जविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

money saving tips, तुमचा पगार येताच सर्व पैसे होत आहेत खर्च? तर वापरा बचतीचा ‘हा’ फॉर्म्युला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version