मोठी बातमी! पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणाबाजी केली होती. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक कऱण्यात आली. थोर महापुरुषांबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ त्यांच्याच कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील हाय हाय च्या घोषणाही देण्यात आल्या. त्यातच शाईफेक झाली. शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे जिल्ह्यातील पिंपरी शहरात शाईफेक करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांनी काल भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली होती. पण त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आलीय.

चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या संभाव्य गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यासाठी ते राहणार उपस्थित आहेत. महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या घराजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. असं असतानाही चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर एका व्यक्तिनं शाईफेक केली.

हे ही वाचा : 

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर अजित पवारांची जोरदार टीका

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version