spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का; दिपाली सय्यद अखेर शिंदे गटात प्रवेश करणार

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दिपाली सय्यद यांनी आपल्या प्रवेशाची माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दिपाली सय्यद यांनी आपल्या प्रवेशाची माहिती दिली आहे. “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मला शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे, असं दीपाली सय्यद म्हणाल्या. यावेळी त्यांनी थेट रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली.

दिपाली सय्यद यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गट सोडणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मी येत्या शनिवारी शिंदे गटात सहभागी होणार आहे. येत्या तीन दिवसांवर माझा प्रवेश आहे. त्यामुळे कधी आणि किती वाजता प्रवेश करायचा. कुठे प्रवेश होईल, याची चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.

माझा शिंदे गटात प्रवेश होत आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले आहे. प्रवेशासंदर्भात कसं, काय, कधी ही चर्चा करण्यासाठी भेट होणार आहे. मला शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती स्वीकारेन. मला शिंदे यांनी राजकारणात आणले. म्हणून त्यांच्यासोबत जाते आहे. मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी वहिनी नाराज आहेत. मी शिंद-ठाकरे गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला, पण नाही आले म्हणून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

पक्ष सोडण्याचं ठोस कारण हेच आहे. गद्दारीचं राजकारण म्हणतात, पण ही गद्दारी नाही हा हक्क आहे. एक राजा असतो, त्याच्या आजूबाजूला सेनापती असतात, त्यांचेही अधिकार असतात, माझ्या पदरी काय येणार, माझ्या वाट्याला काय येणार, की हुलकावणी देत असतात, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू मांडली.

यावेळी दीपाली सय्यद यांनी कारागृहात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. “संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळत आहे. तोंडाने पक्ष फोडून त्यांनी पाप केलं. त्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळत आहे. संजय राऊत यांना जी शिक्षा झाली ती त्यांच्या पापाची शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं ते उत्तम उदाहरण आहे. हे दोन गट त्यामुळेच झाले आहेत.

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी यापूर्वी अनेकवेळा आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी त्यांनी ‘मी सध्या वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे, असं म्हटलं होतं. याआधी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी आपण लवकरच कोणत्या गटात हे जाहीर करु असं सांगितलं होतं. त्यामुळे आता दीपाली सय्यद यांचा वेट संपला आहे, त्यांनी शिंदे गटात जाण्याची भूमिका घेतली आहे.

हे ही वाचा :

Sanjay Raut : मोठी बातमी : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर

IND vs ENG Semi Final : रोहित शर्मा उपांत्य फेरीत खेळणार नाही? कालच्या दुखापतीवर महत्वाचे अपडेट्स आले समोर

Earthquake : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यं भूकंपाने हादरली, नेपाळमध्ये मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss