मोठी बातमी! भाजप माजी आमदाराच्या घराच्या आवारात सापडले मृतदेह

मोठी बातमी! भाजप माजी आमदाराच्या घराच्या आवारात सापडले मृतदेह

सातारा जिल्ह्यातील भाजपाच्या माजी आमदाराच्या (Former MLA of BJP) बंगल्यामागे एका महिलेचा कुजलेला मृतदेह (Decomposing body of a woman) आढळला आहे. आमदाराच्या बंगल्यामागेच हा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

भाजपच्या माजी आमदरांच्या बंगल्याच्या आवारात अर्धवट पुरलेला मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सातारा जिल्ह्यातील वाढे गावच्या हद्दीत भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे (Former BJP MLA Kantatai Nalavde) यांच्या बंगल्याच्या आवारात हा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह या ठिकाणी कोणी पुरला आणि मृतदेह नक्की कोणाचा आहे? याबाबत पोलिस कसून शोध घेत आहेत.

भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांचा हा बंगला बंद असतो. मात्र, बंगल्याच्या आवारातील मागील परिसरात स्वच्छता सुरू असताना कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती समजताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, मृतदेह नक्की कोणाचा याबाबत अद्याप माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंगल्यापरिसरात अशी घटना घडल्यामुळे जिल्हाभरात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह चिखलात (mud) टाकून देण्यात आला होता. सातारा पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतरच या प्रकणाबाबची अधिक माहिती समोर येईल. परंतु, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. दरम्यान, कुजलेल्या स्थितीत असलेला हा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

शिंदे गटाच्या आमदाराच्या मुलाकडे बिल मागितलं म्हणून, चक्क हातपाय तोडण्याची दिली धमकी

Smartphone Offer पहा फक्त पाच हजार रुपयात मिळतोय ‘हा’ फोन, पहा काय आहे ऑफर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version