spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी ! शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर उद्धव ठाकरेंचं चिन्ह ‘मशाल’

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरु होते. सुरुवातील एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यानंतर दसरा मेळाव्यावरून वाद झाले आणि अंधेरी पोट निवडणूकच्या पार्शवभूमीवर शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरु होते. सुरुवातील एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यानंतर दसरा मेळाव्यावरून वाद झाले आणि अंधेरी पोट निवडणूकच्या पार्शवभूमीवर शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. आणि शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने आज याबद्दलचा निर्णय दिला आहे.

हे ही वाचा : Uddhav Thackeray Live : फेसबुक लाईव्हमार्फत उद्धव ठाकरेंनी साधला जनतेशी संवाद…

उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तर शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं आहे.

रविवारी सायंकाळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पर्यायी नावं आणि चिन्हंदेखील त्यांनी दाखवून दिले होते. त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या चिन्हांचे फोटो उद्धव ठाकरेंनी दाखवले होते. शिवाय नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पर्यायी नावं निवडणूक आयोगाला दिली होती. तसेच निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले होते यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला होता. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले होते. यापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळालं आहे.

हे ही वाचा :

सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, अमित शाह यांची समितीला शिफारस

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss