spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार?, नरेंद्र मोदींना केली विनंती

पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करताना आपले भावी आयुष्य वाचन आणि लेखनात घालवायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सततच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचा राज्यपाल या पदावरून मुक्त होण्याची इच्छा त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही बोलून दाखवली आहे. पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करताना आपले भावी आयुष्य वाचन आणि लेखनात घालवायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना ना सर्व प्रकारच्या राजकीय जबाबदाऱ्यांपासून मुक्तता हवी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, मला महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे. महाराष्ट्र एक अशी भूमी जी संत आणि समाजसेवकांची भूमी आहे. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील जनतेकडून मला मिळालेले प्रेम मी कधीही विसरू शकत नाही. पदमुक्त होण्याच्या इच्छेबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो असल्याची माहितीही कोश्यारी यांनी दिली. पंतप्रधान मोदी जेव्हा मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांना राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे, असे मी स्पष्टपणे सांगितले होते.

आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अशा प्रकारे राजीनामा दिल्याच्या चर्चेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे भगतसिंग कोश्यारी यांचा वादांशी असलेला संबंध अधिक घट्ट होत चालला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमावरून या वादांना सुरुवात झाली. त्या कार्यक्रमात कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहाबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. याशिवाय गुजराती आणि मराठी समाजाबद्दलही त्यांनी आक्षेपार्य वक्तव्य केली होती.

या सर्व विधानांमुळे उद्धव ठाकरे आणि इतर विरोधी पक्षांना सतत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यावर भाजपकडून उघडपणे काहीही बोलले गेले नाही, पण राजकीय मैदानावर भाजपसाठी आव्हान वाढत होते. आता या पार्श्‍वभूमीवर भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय भूमिका घेते, शिंदे गट आणि भाजप काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

मोठी बातमी, अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss