मराठवाड्याची तोफ थंडावली, शेकापच्या केशवराव धोंडगे यांचं निधन

विधानसभेतील त्यांची अनेक भाषणं प्रचंड गाजली. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ख्याती होती.

मराठवाड्याची तोफ थंडावली, शेकापच्या केशवराव धोंडगे यांचं निधन

शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालंय. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे (Keshavrao Dhondge Passed Away) हे दीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व केलं. विधानसभेतील त्यांची अनेक भाषणं प्रचंड गाजली. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ख्याती होती.

केशवराव धोंडगे हे ५ वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते. तसेच एक वेळा ते लोकसभेची निवडणूकही जिंकले होते. सर्वसामान्य जनतेच्या समस्या ते सभागृहात पोटतिडकीने मांडत असत. विधानसभेत त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत. ते निर्भिड आणि स्वाभिमानी बाण्याचे जनप्रतिनिधी होते. केशवराव धोंडगे यांनी आणीबाणीच्या लढ्याचेही नेतृत्व केले होते. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ते १४ महिने कारावासात होते. यातून महाराष्ट्राचा त्यांचा लढाऊ आणि स्वाभिमानी बाणा दिसला होता.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत स्वत:ला जोडून घेतले. त्यांची साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विषयांवर अढळ निष्ठा होती. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतीडकिने विधिमंडळ आणि संसदेत मांडले.

डॉ.केशवराव धोंडगे आणि त्यांनी केलेली सत्याग्रह आंदोलने

डॉ.केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील आणीबाणी विरोधी लढा लढला गेला. नाशिक सेंट्रल कारागृहामध्ये १४ महिनै कारावास भोगत स्वाभिमानी बाणा दाखवला.१९८५ साली गुराखीगड स्थापण करुन जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन भरवून अनोखा विक्रम केला.रेकॉर्डब्रेक जवळपास हजारो सत्याग्रह विविध नाव देवून यशस्वी केले.त्यात पिंडदान सत्याग्रह, बोंबल्या सत्याग्रह, शेणचारऊ सत्याग्रह, खईस कुत्री सत्याग्रह ठळक आहेत.

हे ही वाचा:

कर्नाटकात स्वबळावर विधानसभा लढवून भाजप पुन्हा सरकार बनवेल, अमित शहांची घोषणा

नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं? नितीश कुमारांनि दिलाय अमृता फडणवीसांना प्रतिउत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version