spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनिल देशमुखांना मोठा दिलासा; अखेर खासगी रूग्णालयात उपचारांची परवानगी

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांना अखेर खासगी रूग्णालयात उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. हृदय विकारानं त्रस्त असलेल्या देशमुखांना जसलोकमध्ये अँजिओग्राफी करण्यास सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. अनिल देशमुख यांना नुकतंच ईडीने केलेल्या कारवाई प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांनी आपल्याला अँजिओग्राफीसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावं अशी मागणी केली होती. त्यावर सुनावणी घेताना मुंबई सत्र न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात असून त्यांना ४ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. ईडीने केलेल्या कारवाईत हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण त्यांच्यावर सीबीआयनेही गुन्हा दाखल केल्याने अद्याप या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नाही. जोपर्यंत सीबीआयकडून त्यांना जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही, म्हणूनच सीबीआय न्यायालयानेही आपल्याला जामीन मंजूर करावा यासाठी अनिल देशमुखांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. ईडीने त्यांना ज्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे त्याच प्रकरणाची सीबीआयकडूनही चौकशी सुरु आहे. त्यामुळे सीबीआय न्यायालयानेही आपल्याला जामीन द्यावा, अशी मागणी अनिल देशमुखांनी आपल्या जामीन अर्जातून केली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं. हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याच एफआयआरवर ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी देशमुखांवर ईसीआयआर दाखल करण्यात आला आणि त्यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक करून त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. तेव्हापासून देशमुख सुमारे वर्षभर मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातच आहेत.

हे ही वाचा:

Russia-Ukrain War: ७५ क्षेपणास्त्रांसह रशियाने चढवला युक्रेनवर हल्ला, पाच जणांचा जागीच मृत्यू

हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे श्रीरामांनीच ठाकरेंकडून धनुष्यबाण हिसकावून घेतला ; रवी राणा

Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss