शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा, नुकसान भरपाईत मोठी वाढ

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा, नुकसान भरपाईत मोठी वाढ

जेव्हा पासून शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt) महारष्ट्रात आलं तेव्हा पासून अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस (Unseasonal rain) अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान ( heavy rains) झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागानं हा निर्णय जाहीर केला आहे. जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी ६ हजार ८०० रुपयांऐवजी आता १३ हजार ६०० रुपये मिळणार आहेत तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० ऐवजी आता २७ हजार रुपये मिळणार आहेत.

जून आणि ऑक्टोबरमहिन्यात (June and October) राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. यानंतर झालेल्या नुकसानीसाठी मदतीची मागणी केली जात होती. यानंतर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर पावसामुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ५ हजार ४३९ कोटींचा निधी तरतूद करण्यात आला आहे.

शासन निर्णयात (government decision) म्हटलं आहे की, पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयानुसार संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरीत करण्यात येत असली तरी लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करुन त्यानंतरच शासन निश्चित करेल अशा पद्धतीनं लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं रक्कम हस्तांतरीत करावी, असं शासन निर्णयात म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेतील शेवंता करणार या दिग्दर्शकाशी लग्न , हळदीचे फोटो झाले व्हायरल

केंद्रात भाजपा सरकार आल्यापासून देशात ड्रग्जच्या तस्कारीत वाढ, नाना पटोलेंच्या आरोप

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version