मुंबई पोलिसांकडून प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा

मुंबई पोलिसांकडून प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहेमीच चर्चेत राहणार नाव म्हणजे प्रताप सरनाईक. शिवसेनेमध्ये ईडीचे (सक्त वसुली संचालकाकडून) पडलेले छापे ते शिवसेनेतून बंद करून शिंदे गटात शामिल झालेले प्रताप सरनाईक हे महाराष्ट्रात चांगलेच प्रसिद्ध आहेत. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. जरी मुंबई पोलिसांनी प्रताप सरनाईक यांना दिलासा दिला असला तरी सर्वांचे लक्ष हे इडीच्या निर्णयावर आहे.

ठाण्याचे ओवळा आणि माजिवडाचे आमदार प्रताप सरनाईक यांना मुंबई पोलिसानंकडून मोठा दिलासा मिळाला आहे. टॉप्स सिक्युरीटी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘सी समरी’ रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांच्या विरोधात आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटले. याच रिपोर्टच्या आधारावर अटकेत असलेल्या आरोपींनी ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टात अर्ज केला आहे. अमित चांदोले आणि टॉप्स सिक्युरीटीचे माजी संचालक शशिधरन यांनी कोठडीला विरोध करत आता दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. मूळ प्रकरणात ईओडब्ल्यूनं सादर केलेला ‘सी समरी’ रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं स्वीकारला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून ईडीला २१ सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तोपर्यंत आरोपी चांदोले आणि शशिधरन यांना कोठडीतच ठेवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले.

नोरा फतेही आणि सिद्धार्थ मल्होत्राचे थँक गॉडमधील नवे गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीस

२०१४ साली एम एम आर डीए ला ३५० ते ५०० सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुप या कंपनीला मिळालं होतं. मात्र या सुरक्षा रक्षक कंत्राटबाबत गैरप्रकार झाला आणि त्याचा आर्थिक फायदा प्रताप सरनाईक आणि अमित चांदोले यांनी घेतला, अशी तक्रार कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यानं केली होती. मनी लॉंड्रिंग कायद्यांतर्गत टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीने त्यांच्या घरावर आणि कार्यालयात धाडी टाकून गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यात आली. टॉप ग्रोपू घोटाळ्या प्रकरणात सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही ईडीनं अटक केली आहे. जमीन अर्ज मंजूर व्हावा म्हणून एम. शशिधरन आणि अमित चांदोले या दोघांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयकडून ईडीला उत्तर सादर करण्याचे आदेश देत सुनावणी २१ सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे.

हे ही वाचा:

कोठडीत असलेल्या संजय राऊतांच्या ‘या’ वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चा

जाणून घ्या आजच्या काळातील ओझोन थराचे महत्त्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version