spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई पोलिसांकडून सोमय्या पिता पुत्रांना मोठा दिलासा

मुंबई पोलिसांच्या EOW टीमने INS विक्रांत विमानवाहू जहाज रद्द होण्यापासून वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांना क्लीन चिट दिली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विक्रांत बचाव घोटाळ्याचा आरोप केला होता. पण, पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचा दावा करत मुंबई पोलिसांनी नील सोमय्यांना क्लीन चीट दिली आहे.

आयएनएस विक्रांत बाचव मोहिमेतून मुंबईत (Mumbai) ठिकठिकाणी लोकांकडून मदतनिधी उभारण्याचा घाट घालत सुमारे ५७ कोटींचा निधी जमा केल्याचा सोमय्यांवर आरोप झाला होता. मात्र या निधीचा सोमय्या पिता-पुत्रांनी अपहार केल्याचा आरोप करून माजी सैनिक बबन भोसले यांनी ७ एप्रिल २०२२ रोजी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार ट्रॉम्बे पोलिसांनी (Trombay Police) भारतीय दंड संहितेच्या कलम ४२९, ४०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई सत्र न्यायालयानं (Bombay Sessions Court) अटकपूर्व जामीन नाकारला होता.

प्रकरण काय ?

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत ही युद्धनौका (battleship) भंगार होण्यापासून वाचवण्यासाठी कोट्यवधींचा निधी उभारला. त्याने ५० कोटींहून अधिक रक्कम जमा केल्याचे सांगितले जात आहे. जमा झालेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आता होत आहे.

त्याचवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर INS विक्रांतमध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी आपली बाजू मांडत ‘मी काहीही चुकीचे केलेले नाही’ असे म्हटले आहे. मी चौकशी करण्यास तयार आहे. यामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. मी तपासासाठी पूर्णपणे तयार आहे.

हे ही वाचा : 

Sanjay Raut सरकार बदलणार सर्वांचा हिशोब पूर्ण होणार, मविआच्या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने संजय राऊत संतापले

Mumbai Fire News मुंबई लोअर परळ भागातील अविग्नॉन पार्क इमारतीच्या ३५व्या मजल्याला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss