पंकजा मुंडेंना मोठा धक्का; धनंजय मुंडेंच्या गटाचा दणदणीत विजय

पंकजा मुंडेंना मोठा धक्का; धनंजय मुंडेंच्या गटाचा दणदणीत विजय

बीडच्या परळी येथील पांगरी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गटाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तब्बल दहा वर्षानंतर पांगरी येथील सोसायटीवर धनंजय मुंडे यांचे एकहाती वर्चस्व पहावयास मिळाले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या गटाचा पांगरी सेवा सहकारी सोसायटीमध्ये दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे आणि याच ठिकाणी गोपीनाथगड आहे. पंकजा मुंडे ह्या २०१४ ते २०१९ या काळात परळीच्या आमदार आणि राज्यात कॅबिनेट मंत्री होत्या. मात्र याहीकाळात धनंजय मुंडे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चाव्या असायच्या. परळी नगर पालिका, बाजार समिती, ग्रामपंचायती; या संस्थांवर धनंजय मुंडेंचं वर्चस्व राहिलेलं आहे. बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झालेले आहेत. या सोसायटीवर दहा वर्षांनंतर धनंजय मुंडे यांनी बाजी मारली.

याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पराभवाची धूळ चारली होती. तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव करणारे धनंजय मुंडे जायंट किलर ठरले होते.राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी पंकजा मुंडे या सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या कारभारावर टीका करत होत्या. राजकीय संघर्षासाठी एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या दोघांमध्ये बहीण भावाचं नातं राहिलेलं नाही, अशी कबुली धनंजय मुंडे यांनी दिली होती.

हे ही वाचा :

विजय मल्ल्याला मोठा धक्का; खटला लढण्यास वकिलाचा नकार

चीनमध्ये सरकारच्या विरोधात ‘या’ भारतीय गाण्याचा होतोय वापर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version