spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठं वक्तव्य, दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी आमची अपेक्षा, नेमकं कोण म्हणालं?

मुख्यमंत्री पदाची खुर्ची नेमकी कोण मिळवणार याबाबत देखील अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल एक मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.

राज्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुका या पार पडला. आणि त्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे. राज्यातील विधानसभा निवडणुका या तोंडावर येऊन ठेपले आहेत. त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला देखील सुरुवात झाली आहे. अद्याप विधानसभा निवडणुकांची कोणतीही तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु पक्षांनी मात्र त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांकडून आमदारांची चाचपणी सुरू आहे. तसेच मुख्यमंत्री पदाची खुर्ची नेमकी कोण मिळवणार याबाबत देखील अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल एक मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर या गेल्या काही दिवसांपासून जळगावात आहेत. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा जळगावात मेळावा पार पडत आहेत. नुकतंच रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जळगावातील पारोळा काल महिलांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमच्या दादांनी मुख्यमंत्री व्हावे अशी अपेक्षाही रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केली. “विधानसभा निवडणुकांसाठी अद्याप अवकाश आहे, मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण? याबद्दल सध्या चर्चा सुरु आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आपापले नेते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. प्रत्येकाला आपला नेता मोठा व्हावा, असं कार्यकर्ता म्हणून वाटत असते. त्यामुळे आमचा नेता मोठा व्हावा, अशी कार्यकर्ता म्हणून आमचीही इच्छा आहे. त्यामुळे आमच्या दादांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची अपेक्षा आहे”, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान अजित पवार गटाची नुकतंच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य २० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या उमेदवारांच्या नावांची यादीही समोर आली आहे. यानुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे. तर बीड परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये नेमकं काय काय काय होणार हे पाहणं गरजेचे आहे.

हे ही वाचा:

Lalbaugcha Raja Visarjan 2024: ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Hezbollah Pager Blasts: पेजर म्हणजे नेमकं काय? पेजरला हॅक करता येतं का?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss