spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपा माजी खासदारचं मोठं वक्तव्य, शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक

पंढरपूरचं (Pandharpur) कॉरिडोअर करण्यावरून भाजपच्या (BJP) बड्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. या संबधी महाराष्ट्रात येत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना भाजपच्या बड्या नेत्याने चॅलेंज दिलं आहे. तर देवेंद्र फडणवीसजी, जास्त बोलाल तर तुम्ही उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, अशा शब्दात फडणवीस यांना इशाराही देण्यात आला आहे. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) आज पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवरती टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘तोडके बनायी है…. निवडणूक लढवून नाही बनवली. आमदार फोडून सरकार बनवलं हे बरोबर नाही. हरयाणात एकदा शंभर टक्के इंदिरा काँग्रेस (Indira Congress) झाली होती. हा जोक मी पाहिला आहे. त्यावर लोक हसत होते. त्यामुळे इंदिरा गांधींची खूप बदनामी (Defamation) झाली होती. आता आमचीही बदनामी झाली आहे. सरकार फोडून नवं सरकार बनवण्याची गरज नव्हती. विरोधात बसून आघाडीची पोलखोल करायची होती. ही खिचडी होती अधिक काळ चालली नसती… असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय.

“त्याची (कॉरिडॉर) काय घाई आहे कळत नाही. त्याऐवजी चंद्रभागा (Chandrabhaga) नदी स्वच्छ करा. इथं एखादं विमानतळ बांधा. या ठिकाणी किती लोकांना याययचं असतं, महाआरतीमध्ये सहभागी व्हायचं असतं. त्यांना धूळ मातीमध्ये यावं लागतं इथे. त्यामुळे आधी ते करा. त्यामुळं (विकासकामांमुळे) सर्व काही छान होईल. नंतर कॉरिडॉरचं बघता येईल,” असं स्वामी म्हणाले.

हे ही वाचा : 

Tirumala Tirupati Devasthanam दर्शनासाठी तिकिटांची मागणी वाढली, ४० मिनीटात सर्व तिकिटांची झाली विक्री

ऐन Christmas च्या हंगामात अमेरिकेत धडकणारा ‘Bomb Cyclone’ आहे तरी काय?

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss