spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिंदूमाधव ठाकरेंच्या सुपुत्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील 40 आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा दर्शवत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. शिवसेनेतील आमदारांसह खासदार पदाधिकारी माजी नगरसेवक हे शिंदे गटांमध्ये स्वैच्छणे सहभागी झाले आहेत. यानंतर आता ठाकरे कुटुंबातून देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला जात आहे काही दिवसांपूर्वी स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

निहार बिंदूमाधव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठाकरे घराण्यातील आणखीन एक व्यक्ती राजकारणात एन्ट्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरण कशा पद्धतीने बदलले जाणार आहे हे पाहणं गरजेचं ठरेल.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल, सरकारी कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी तक्रार

कोण आहेत निहार ठाकरे?

निहार बिंदूमाधव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत त्यांचे वडील बिंदू माधव ठाकरे यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले होते.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव ठाकरे हे निहार ठाकरेचे सख्खे काका व राज ठाकरे हे निहार यांचे चुलत काका आहेत नेहा ठाकरे यांनी एलएलएम पर्यंत शिक्षण घेतले असून सध्या ते वकिलीच्या व्यवसायात आहेत.

ओबीसी आरक्षण बाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली अन् म्हणाले…

Latest Posts

Don't Miss