अजित पवार यांच्या विरोधात भाजपा आक्रमक, प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन

अजित पवार यांच्या विरोधात भाजपा आक्रमक, प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन

सध्या महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पूर्वजांच्या नावावरून राजकारण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात (Winter sessions) केलेल्या एका विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपा आक्रमक झाली असून पुण्यामध्ये पवारांच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे. “छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षकच होते”, असं अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणाले होते, त्याचे पडसाद आता उमटत आहेत. आज भारतीय जनता पार्टीकडून अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

पुणे आणि नाशिकमध्ये भाजप (BJP) आक्रमक झाला आहे. कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. नाशिकमध्ये भाजप समर्थकांनी अजित पवारांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. तर पुण्यातही अजित पवारांच्या राजीनाम्याची (resignation) मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. विशेष म्हणजे बारामतीत (Baramati) अजित पवार यांच्या घरासमोरही हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. तर नाशिकमध्ये (Nashik) आमदार देवयानी फरांदे, अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale) आंदोलनात सहभागी झाले. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तर अजित पवारांविरोधात घोषणाबाजीही केली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. अजित पवारांना भाजपने घेरलं असताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलंय. तर आपल्या ट्विटमध्ये आणखी एक खळबळजनक वक्तव्य केलंय. संभाजीराजेंसारक्या शूरवीराला बदनाम करण्याचे प्रयत्न एका वर्गाकडून अनेक वेळा सुरु आहेत. पण सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते. कुणी यावर बोलेल का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे .

हे ही वाचा : 

लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर होणार ‘अपसंपदा’कडून कारवाई?

केंद्राला सुप्रीम दिलासा, नोटबंदी सरसकट अयोग्य ठरविली जाऊ शकत नाही

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version