spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढू” देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

बारामती हेसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून बारामती मिशन महाराष्ट्रमध्ये आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मी स्पष्टपणे सांगतो की, भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढू आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Municipal Corporation) भगवा फडकवू. तसेच भाजपच्या मिशन महाराष्ट्र बद्दल बोलता असताना ते म्हणले कि, भाजपचा (BJP) मिशन इंडिया आहे. भाजपचा मिशन महाराष्ट्र (Maharashtra) आहे. बारामती हेसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून बारामती मिशन महाराष्ट्रमध्ये आहे. त्याचबरोबर लास्ट फ्रंटीयर वगैरे काही नसतं, निवडणुकीच्या दृष्टीने आमच्यासाठी प्रत्येक सीट महत्त्वाची आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या सगळ्यांच्या मनात आहेत. परंतु, सरकारी कार्यालयं ही नियमानी चालतात. आदेशानी चालतात. त्यामुळं अशाप्रकारचे आदेश बरेचवेळा काढले जातात. यामुळं फुले दाम्पत्याच्या फोटोसाठी निर्णय घेण्यात आला. राज्यातच नव्हे तर देशात फुले दाम्पत्याचा मान मोठा आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

कुठलीही निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे, असं समजून झोकून द्यावं लागतं. त्यावेळी ती निवडणूक आपल्याला जिंकता येते. हे केवळ मुंबई महापालिकेबद्दल नव्हतं. तर एकूणच निवडणुकीच्या धोरणाबद्दल होतं, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबईच नव्हे, तर राज्यात सर्व महापालिका शिंदे गटाला सोबत घेऊन लढण्यात येणार आहेत. भाजप आणि शिंदे गट सक्रिय झाले आहेत. उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या विधानांनुसार भाजप आणि शिंदे गट आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणार आहेत. पण आता देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यानुसार मुंबई महानगरपालिकेवर शँडे गट आणि भाजपचा भगवा फडकतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे ही वाचा:

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर ‘मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले’ म्हणत शिवसेनेने लगावला टोला

‘ती बाई आम्हाला काय शिकवणार?’ चंद्रकांत खैरेची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss