Beed BJP : बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियानी यांनी स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या, अद्यापही कारण अस्पष्ट

Beed BJP : बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियानी यांनी स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या, अद्यापही कारण अस्पष्ट

बीड येथील भाजपचे शहराध्यक्ष भगिरथ बियाणी यांनी स्वता:जवळील बंदुकीने डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी बीड शहरातील एमआयडीसी भागातील बियाणी यांच्या राहत्या घरी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही.

हेही वाचा : 

Ram Setu Trailer: अंगावर शहारे आणणारा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

घटनेनंतर त्यांना तत्काळ शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना ही माहिती कळताच त्या तत्काळ रुग्णालयात पोहोचल्या. भगीरथ बियानी यांनी बीडपासून सुमारे २५ किमी लांब असलेल्या त्यांच्या एमआयडीसी परिसरातील घरामध्ये आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या घरी पिस्तुल सापडलं असून त्यामधून गोळी झाडल्याचं स्पष्ट आहे अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिली आहे.

Palghar Case : राज्य सरकारचा निर्णय, साधू हत्याकांड प्रकरणी तपास आता CBI करणार

भगीरथ बियाणी यांच्या कुटुंबातील सदस्यांना याची सर्वप्रथम माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बियानी यांना रुग्णालयात दाखल केलं. पण त्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. रूग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता. आत्महत्या मागचे कारण काय? याचा तपास पोलीस घेत असल्याचे सांगणयात आले.

Bharat Jodo Yatra : काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ ९ नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहचणार, शरद पवारांकडून स्वागत

Exit mobile version