spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपला एकनाथ शिंदे सुद्धा नको; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (Shiv sena) यांच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (Shiv sena) यांच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नको होते, त्याच पध्दतीनं एकनाथ शिंदेसुद्धा (Eknath Shinde) त्यांना नको असल्याचे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

दरम्यान राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर दोखील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. वैयक्तिक स्तरावर सुरू असलेलं राजकारण काही योग्य नाही. ही गादीची लढाई नाही, हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावं. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. तोच ठरवेल सत्ता कोणाच्या हातात द्यायची, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

ज्याप्रमाणे भाजपला उद्धव ठाकरे हे नको होते, तसेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नको आहेत असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. हे बॅगेज त्यांना बाहेर काढायचे आहे. त्यांना परिस्थिती अनुकूल दिसली तरच एकनाथ शिंदे यांना निवडणुकांमध्ये सोबत घेतील असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती होते का हे पाहावं लागेल असेही ते म्हणाले.

युतीबाबत देखील प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, पहिलं प्राध्यान कोणाला हा विषय नाही. आमच्या पक्षाच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले होते की, काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याबरोबर युती करु, या भूमिकेला कोणी प्रतिसाद दिला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जो कोणी पहिला प्रस्ताव देईल, जो सोयीचा वाटेल त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेऊ असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

सध्या अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीसंदर्भात देखील प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, या निवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असल्यानं त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही. आमच्याकडे अद्याप कोणीही पाठिंबा मागितला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. सुप्रीम कोर्टाने जे अनियंत्रित अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचं काय होऊ शकत याची माहिती मी लोकांसमोर मांडली होती असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

हे ही वाचा :

Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत खिशाला झळ ! फटाक्यांच्या दारात देखील वाढ

Andheri Bypoll Election 2022: वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा कुणाला, शिवसेना की भाजप? प्रकाश आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss