भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला; देवेंद्र फडणवीस

भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला; देवेंद्र फडणवीस

राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल समोर येत आहेत, दरम्यान ८८९ ग्रामपंचायतींपैकी जवळजवळ ३९७ ठिकाणी भाजपचा विजय झाला असून एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेला ८१ ठिकाणी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ८७ ठिकाणी विजय मिळाला असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, या निवडणूकीत कॉंग्रेस १०४ , राष्ट्रवादी ९८ आणि अपक्ष ९५ ठिकाणी आहेत याचा अर्थ असा आहे की भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे, तसेच एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप महाविकास आघाडीच्या एकत्रित आकड्यापेक्षा खूपच पुढे असल्याचे फडणवीस म्हणाले. लोकांनी पुन्हा एकदा आमच्यावरच विश्वास दाखवला असेही ते म्हणाले. फडणवीस यांनी यावेळी या विजयासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकर्त्यांचे आभिनंदन देखील केलं. आज राज्यातील ११६५ पैकी १०७९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर तब्बल ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूका या बिनविरोध झाल्या होत्या. दरम्यान भाजपकडून ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचा दावा केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात आमच्याकडे बराच विचार झाला, विशेषता कार्यकर्त्यांचं मत होतं आम्ही निवडणूक लढवली पाहिजे, मुंबई युनिटचंही मत होतं आम्ही निवडणूक लढवली पाहिजे. मुरजी पटेलांसारखा उमेदवार ज्यांनी अपक्ष असूनही ४५ हजारांपेक्षा अधिक मतं घेतले तो उमेदवार आम्ही उभा केला होता. त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती. तथापि काहींनी आम्हाला विनंती केली, काही ज्येष्ठांनी विनंती केली. तुम्हालाही कल्पना आहे की राज ठाकरे किंवा शरद पवार असतील. काहींनी समोरून केली तर काहींनी मागून केली. आता मागून कोणी केली हे विचारू नका, राजकारणात सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. पण ज्यांनी कोणी केली, त्यावर विचार करून मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोललो, आमच्या वरिष्ठांशी बोललो. आमच्या टीमशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर हा निर्णय आम्ही घेतला आहे.”

तर “हा निर्णय काही आम्ही पहिल्यांदा घेतलेला नाही. आर.आर.पाटील ज्यावेळी गेले होते तेव्हाही आम्ही असा निर्णय घेतला होता. पतंगराव कदम गेले होते तेव्हाही आम्ही असाच निर्णय घेतला होता. त्यामुळे हा काही पहिल्यांदा घेतला निर्णय नाही. काही लोक छोट्या-छोट्या मनाचे असतात. त्यामुळे तुम्ही कसाही निर्णय घेतला तरी ते त्या संदर्भात बोलत असतात. पण आता ते जे काही बोलले आहेत, त्याला उत्तर ग्रामपंचायतीच्या निकालानेच दिलं आहे. असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

हे ही वाचा :

यंदा पुणेकरांची दिवाळी पाण्यात ?

‘साई रिसॉर्ट’ च्या मालकाला तूर्तास दिलासा; हायकोर्टानं कारवाई करण्यापूर्वी रितसर नोटीस बजावण्याचे निर्देश दिले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version