spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BJP : राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अखेर भाजपनं दिली प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते. तर तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी भाषण करताना राज्यपालांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली. आता यावरून चांगलेच राजकारण तापले असून यावर भाजपची प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : 

Viral Video : नाव ‘दत्ता’ अधिकाऱ्यांने रेशन कार्डवर लिहलं ‘कुत्ता’ ; पीडित तरुणाने कुत्रा बनून अधिकाऱ्याला शिकवला धडा

भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. ट्विटमद्धे संजय कुटे म्हणतात की, “आम्ही राज्यपालांच्या या वक्तव्याशी कदापि सहमत नसून तीव्र शब्दात याचा निषेध करीत आहोत. त्यांचे राज्यातील वारंवार होत असलेले हे अशोभनीय वर्तन अयोग्य आहे. याबद्दल मा.पंतप्रधान व इतर पक्षश्रेष्ठीनच्या लक्षात ही बाब नक्कीच आनल्या जाईल.” अशा शब्दात भाजप राज्यपालांच्या मतअशी सहमत नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

तर पुढच्या ट्विटमध्ये संजय कुटे म्हणतात की, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि चिर:काल राहणार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले विधान हे व्यक्तिगत असू शकते पण ते महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतिला शोभेल असे नक्कीच नाही असे संजय कुटे यांनी म्हटले.

टाईम पास मधील दगडूची थेट बॉलिवूडमध्ये ,अभिनेता प्रथमेश परबने दिसणार ‘या’ चित्रपटात

दरम्यान राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला असे म्हणत भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विट केलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांवर आता हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळे डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय.

शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली : सुधांशु त्रिवेदी

भाजपच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वातावरण तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्रिवेदी म्हणाले की, त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘सत्तेला चिटकून आहात महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय’; राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

Latest Posts

Don't Miss