विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये; ‘या’ चार नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये; ‘या’ चार नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला (Mahayuti) अवघ्या १७ जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची (MVA Alliance) ३० जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. त्यामुळे आता पुढील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मेगा प्लॅन आखला आहे.

भाजपच्या (BJP) गटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. आगामी विधानासभेच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने भाजपचं मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) या चार नेत्यांवर विधानासभेसाठीची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.

दरम्यान, येत्या आठवड्याभरात २० स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत. तर अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार असल्याचेही बोलले जात आहे.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde यांच्या हस्ते मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा: Mallikarjun Kharge

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version