spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपाला नितीन गडकरी यांची अडचण होत आहे; अकोल्यातल्या सभेत प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. काल रात्री अकोल्यामध्ये मुस्लिम समाजाच्या बैठकीत त्यांनी विधान केले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपमधील काही लोकांना नितीन गडकरी यांची अडचण होत आहे. त्यामुळे ते नितीन गडकरी यांना बाजूला करण्याचा घाट घालत आहेत. मात्र, नितीन गडकरी बाजूला होण्यास तयार नसल्याने त्यांना अडकवण्याचा कट भाजपाचे काही लोकं रचत आहेत, असा मोठा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नागपूरमधील काही अधिकाऱ्यांना पकडत त्यांच्याकडून गडकरींनी लाच मागितल्याचे देखील प्रयत्न सुरु आहेत, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

अकोल्यातील बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला देखील खडे बोल सुनावले आहेत. मुस्लिम समाजाने कानात सांगणाऱ्याचे ऐकणे बंद करावे. तसेच निवडणुकीमध्ये तुम्ही मुस्लिम म्हणून मत दिले तरच तुम्ही टिकू शकाल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. असे केलं नाहीतर पुढच्या काळात तुमच्या नशिबात पुन्हा गोध्रा, अखलाख आणि पॅलेस्टाईनसारखी परिस्थिती निर्माण होईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये आपसातील जागा वाटपाच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांत निवडणूका सुरु होतील. ही साधी निवडणूक नाही. संविधान बदलाचं आणि मुस्लिमांना लक्ष्य करण्याची सुरूवात आता होईल. गोळवलकरांच्या एका पुस्तकावर हे सरकार चालत आहे. रवींद्र वायकर यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहायचा खूप प्रयत्न केला होता. मात्र, जेव्हा पलीकडून फास आवळला गेला तेव्हा त्यांना पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यामुळे ते शिंदे गटात गेले. मला वाटतं महाविकास आघाडी होण्यात मोठ्या अडचणी आहेत. पंधरा जागांवर तीनही पक्षांची भांडणं आहेत. १४ तारखेपर्यंत त्यांची भांडण सुटली तरच आमच्याशी वाटाघाटी होऊ शकेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मॉब लिंचिंगपासून आपल्याला वाचायचे असेल तर त्याच गर्दीशी मैत्री करा. त्याच गर्दीचा एक भाग बना, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करा, त्यामुळे मॉब लिंचिंगची वेळ येणार नाही. देशात दलित आणि आदिवासींची जेवढी ताकद आहे, तेवढीच मुस्लिमांची आहे. मात्र, मुस्लिम आपली ताकद ओळखत नाही हेच त्यांचे दुर्दैव आहे. तुम्ही जागे झाले नाही, तर पुन्हा एक नवीन गोधरा, अखलाक किंवा फिलिपिन्स होईल हे लक्षात ठेवा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा:

डॉ.बाबासाहेबांचे कर्तृत्व हे स्मारकांमध्ये निश्चितच मावणारे नाही- CM Eknath Shinde

राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, निलेश लंकेंनी केला शरद पवार गटात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss