उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावर भाजप नेते आशिष शेलारांनी केली टीका

आज शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आज आणि उद्या रायगड मतरसंघाचा दौरा करणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावर भाजप नेते आशिष शेलारांनी केली टीका

आज शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आज आणि उद्या रायगड मतरसंघाचा दौरा करणार आहेत. नंतर ते ४ आणि ५ तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का ? अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. आधी शेलार ट्विट करत म्हणाले, रत्नागिरीमध्ये जाऊन दाऊदच्या मालमत्तेची आस्थेने पाहणी करून या! असेही शेलार म्हणाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वशंजाकंडे पुरावा मागणारे उबाठा प्रमुख अस्तित्वाच्या खुणा शोधण्यासाठी हा रायगड दौरा केला जाणार आहे. मालवणी, बेहरामपाडा, महमद अली रोड आणि मुंब्रा येथील तुमच्या सगळ्या शिलेदारांना सोबतच घेऊन जा ! जमलंच तर.. दाऊदच्या मालमत्तांचा नुकताच लिलाव झालाय, रत्नागिरीत जाऊन त्याची पण आस्थेने पाहणी करुन या ! रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का ? अशी टीका आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर सुनील तटकरे यांनीसुद्धा टीका केली आहे. म्हणाले, उद्धव ठाकरे रोह्यात येत आहेत त्यांचे स्वागत, त्यांना शुभेच्छा. त्यांनी याआधी कधीच निवडणूक दौरा केला नव्हता. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ही निवडणूक अनंत गीतेंना खूप जड जाणार असल्याची जाणीव असल्यानेच उद्धव ठाकरेंनी हा सखोल दौरा आयोजित केला आहे, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचा आज आणि उद्या रायगड दौरा संपल्यानंतर ते ४ आणि ५ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत.

हे ही वाचा:

रात्री २ वाजता ज्ञानवापी येथील व्यास तळघरात झाली पूजा, ३१ वर्षानंतर गणेश-लक्ष्मीची आरती

Union Budget 2024 : यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष, थोड्याच वेळात सादर होणार अर्थसंकल्प

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version