भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाईचं घेणार दर्शन

भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाईचं घेणार दर्शन

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीने गेल्या आठवड्यात छापेमारी केली. तेव्हापासून मुश्रीफ – सोमय्या यांच्यात वाद रंगला आहे. आज किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. रेल्वे स्टेशनवर (Railway station) भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. सोमय्या आज सकाळी साडेनऊ वाजता अंबाबाईचं (Ambabai) दर्शन घेणार आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी ईडी ने छापेमारी केली होती. आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) सोबत हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आलं. त्या नंतर आज किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणत चर्चा रंगू लागल्या आहेत. तर किरीट सोमय्या हे कोल्हापूरमधून पत्रकार परिषद (Press conference) सुद्धा घेणार असल्याचं माहिती मिळत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या काय बोलणार? पुन्हा हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी एक चित्रफीत समाज माध्यमात अग्रेषित करून ‘आपल्यावरील कारवाई म्हणजे मोठे षडयंत्र आहे, याचा हा धडधडीत पुरावा आहे,’ असे विधान केले आहे. या माध्यमातून मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. मुश्रीफ यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘षडयांत्राचा हा घ्या पुरावा. घरावर छापा सुरू असतानाच किरीट सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफच्या घरावर रेड सुरू झाली आहे, दिल्लीवाल्यांनी कमिटमेंट पूर्ण केली.! यावरूनच हे किती मोठे षडयंत्र रचले आहे, याचा हा धडधडीत पुरावा आहे.’ विशेष म्हणजे, भाजप नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असताना पूर्वसंध्येला मुश्रीफ यांचा हा व्हिडिओ चर्चेत आला असून सोमय्या कोणते उत्तर देणार याचेही कुतूहल आहे.

हे ही वाचा:

ऊस, बांबूच्या क्रॉकरीपासून ते पीठ-गुळाच्या भांड्यांपर्यंत, जाणून घ्या कागदाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या पर्यावरणपूरक पर्यायांबद्दल

अतिप्रमाणात तिळाचे लाडू सेवन करणे शरीरासाठी नुकसान कारक

अतिप्रमाणात तिळाचे लाडू सेवन करणे शरीरासाठी नुकसान कारक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version