‘… नादाला लागाल तर डोळे काढू’ भाजप नेते नितेश राणेंची प्रतिक्रिया

भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे (Bharatiya Janata Party MLA Nitesh Rane) यांच्या उपस्थितीत शिर्डी (Shirdi) येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

‘… नादाला लागाल तर डोळे काढू’ भाजप नेते नितेश राणेंची प्रतिक्रिया

भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे (Bharatiya Janata Party MLA Nitesh Rane) यांच्या उपस्थितीत शिर्डी (Shirdi) येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद (Love Jihad), धर्मांतर आणि आदिवासी तरूणींचे अपहरण अशा सर्व मुद्द्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये माजी आदिवासी विकास मंत्री अशोक विखे (Former Tribal Development Minister Ashok Vikhe) सुद्धा उपस्थित आहेत.

दरम्यान, अमरावती येथे लव्ह जिहाद झाल्याचा आरोप खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केला होता. त्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले असून श्रीरामपूर येथे एका तरूणाने मुस्लीम युवतीशी लग्न केल्यामुळे त्याचे अपहरण करून त्याच्यासोबत घातपात केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ नितेश राणे यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि काही आदिवासी संघटनांना घेऊन मोर्चा काढला आहे. श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला असून हिंदुंवर आत्याचार करणाऱ्याचे डोळे काढू असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी यावेळी हिंदूंना टार्गेट करणाऱ्यांना इशारा दिला असून, “आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आता मुश्रीफ, मलिक मंत्री नाहीत आणि उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री नाहीत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वांत जास्त हिंदुवर आत्याचार झाले. ठाकरे सरकार हे हिंदुविरोधी सरकार होते पण आता भाजपचं सरकार आहे त्यामुळे आता असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. हिंदू मुलांच्या नादाला लागाल तर डोळे काढू.” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हे ही वाचा :

समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था सरसावल्या, अमित ठाकरे सह सेलेब्रिटींनीही घेतला पुढाकार

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी केले हात साफ, तब्ब्ल ५० फोन अन् दागिन्यांची चोरी!

पुढच्या वर्षी लवकर या… मुंबईतील लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version