spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली टीका

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) सुट्टीवर गेल्या होत्या. त्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये सक्रिय नव्हत्या.

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) सुट्टीवर गेल्या होत्या. त्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये सक्रिय नव्हत्या. पण त्यांनी आता अचानक राजकारणात उडी घेत त्यांचा राजकीय सहभाग पुन्हा दर्शवला आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. जालन्यातील मनोज जरांगे हे दहाव्या दिवशीसुद्धा उपोषणासाठी बसले आहेत. त्यांनी उपोषण अजूनही मागे घेतले नाही आहे. तर ते आता मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण बंद करणार नाहीत असे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) म्हणाले ‘ मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ‘ असे आश्वासन त्यांनी मराठा आंदोलकांना दिले आहे. शिंदे यांच्या या आश्वासनावर पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं सांगलीमध्ये शिवशक्ती परिक्रमाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचं दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर टीका केली आहे. कोणीतरी घोषणा करून, आरक्षण मिळणार नाही, संवैधानिक मार्गाने आरक्षण द्यावे लागेल,अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे, असंही पंकजा म्हणाल्या. मराठा आरक्षण दिलाच पाहिजे विद्वान अभ्यासक कमिटी नेमली पाहिजे. यात राजकीय हस्तक्षेप नसावा. यातलं खरं काय आहे, हे निर्भिडपणे परिस्थिती मांडली पाहिजे. मराठा समाजाला विश्वासात घेवून आरक्षण दिले पाहिजे. ओबीसीतून आरक्षण देणे हे शक्य नाही. भुजबळ, नाना पटोले आणि माझी भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण द्यायला लागले, कुणबी प्रमाणपत्र द्यायला लागले आहेत? पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात आरक्षण आहे. कुणबी म्हणून दिले तर ते ओबीसीमधून होईल, असं त्या म्हणाल्या.

पंकजा कोल्हपुरात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं देवी देवतांचा मला आशीर्वाद आहे. लोकांचा देखील मला आशीर्वाद आहे. म्हणून माझ्या चेहऱ्यावर तेज आहे. मी 6 वाजता तयार होते. दिवसभर सत्कार सोहळे, संवाद होतात. म्हणून थोडास ताण जाणवतो. मी लाल साडी घालून देवीच्या दर्शनाला गेले. आपल्याला कुणाच्या दरात जाण्याची वेळ येवू नये. लोकांना देखील अशी वेळ येवू नये, असं साकडं मी देवीला घातलं आहे, असं पंकजा म्हणाल्या. मराठा आंदोलक यात्रेत भेटले त्यांनी व्यथा मांडली. शेतकरी भेटले. त्यांच्याशी संवाद साधला. आदिवासींसोबत नृत्य करण्याचा योग आला. एकूणच महाराष्ट्राच्या संस्कृतीची चव घेतली. मला मुख्यमंत्री झालेले पाहायचे आहे असे लोक म्हणाले, मात्र विषय तसा जुनाच आहे. यात काही नावीन्य नाही, असं त्या म्हणाल्या.

Latest Posts

Don't Miss