CAA कायदा लागू करण्याबाबत, भाजप नेत्याचं ममता बॅनर्जींना थेट

CAA कायदा लागू करण्याबाबत, भाजप नेत्याचं ममता बॅनर्जींना थेट

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांना राज्यातील सुधारित नागरिकत्व कायद्याची (CAA) अंमलबजावणी थांबवण्याचे आव्हान दिले. उत्तर २६ परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर इथं झालेल्या सभेत शुभेंदू अधिकारी म्हणाले, ‘ठाकूरनगर हे मतुआबहुल क्षेत्र आहे आणि या समाजाची मुळं बांगलादेशात आहेत. आम्ही सीएए कायद्याबद्दल अनेकदा बोललो आहोत. राज्यात CAA लागू होणार आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर त्याची अंमलबजावणी थांबवून दाखवा, असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जींना केलंय.

हेही वाचा : 

Suresh Raina birthday : अवघ्या १९व्या वर्षात क्रिकेट विश्वात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या खेळाडूसाठी आज खास दिवस

कलम ३७० प्रमाणे सीएएचे वचनही पूर्ण होईल- शुभेंदू अधिकारी

आपल्या मुद्द्यावर भाष्य करताना शुभेंदू (Suvendu Adhikari) म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर मोदी सरकारने काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, जे पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे भाजप सीएए लागू करण्याचे आश्वासन पूर्ण करतील. केंद्र सरकार कोणाचेही अधिकार काढून घेण्यावर विश्वास ठेवत नाही आणि अशी चर्चा करणाऱ्यांनाच वातावरण बिघडवायचे आहे. मी लोकशाही पद्धतीनं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना माजी मुख्यमंत्री करीन, असं आव्हानही विरोधी पक्षाच्या नेत्यानं दिलं आहे.

‘या’ मुद्यावरुन जनता भाजपचा पराभव करेल, संजय राऊत

CAA बाबत अमित शहा यांचे वक्तव्य…

यापूर्वी, देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एका मुलाखतीदरम्यान उघड शब्दात सांगितले होते की, जे विचार करत आहेत की आपण सीएएची अंमलबजावणी न करण्याचे स्वप्न पाहत आहोत, ते मोठी चूक करत आहेत. ते म्हणाले की सीएए कायद्याची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे कारण त्याबद्दल नियम बनवायचे आहेत, त्यावर काम करणे बाकी आहे. याआधीही अमित शाह यांनी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये CAA लागू केल्याचा उल्लेख केला आहे.

शुभेंदू यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला

शुभेंदू यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम जागेवर ममता आणि शुभेंदू यांच्यात लढत झाली, त्या निवडणुकीत ममता यांचा पराभव झाला. यानंतर दोघांमधील कटुता आणखीनच वाढली आणि दोघेही सतत एकमेकांविरोधात कडवे वक्तव्य करत आहेत.

मनसेची आज मुंबईतील नेस्को ग्राउंडवर सभा होणार, राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

Exit mobile version