निवडणूकीच्या तुफानाची चाहूल लागताच भाजप नेते भूमीपुत्रांसाठी कोळीवाड्यात

निवडणूकीच्या तुफानाची चाहूल लागताच भाजप नेते भूमीपुत्रांसाठी कोळीवाड्यात

राज्यातील सत्ता महाविकास आघाडी कडून हिसकावून घेतल्या नंतर भाजपने आपला मोर्चा मुंबई महानगर पालिकेकडे वळवला आहे. त्यासाठी तीन महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणूकांसाठी भाजप नेत्यांनी नारळी पौर्णिमेचा मुहूर्त साधत शहरातील कोळीवाड्यातील कोळ्यांना साद घातली. भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांना गेली अनेक वर्षे धोरणात्मक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या नवे शिंदे-फडणवीस सरकार प्राधान्याने सोडवेल असा विश्वास माजी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी खारदांडा वासियांना दिला.

मुंबईतील कोळीवाड्यांंचे सिमांकन, घरांचे पुर्नविकास, कोळीवाड्यातील जागांचे संरक्षण, मासळी सुकवण्याबाबतच्या समस्या या सगळ्या कोळीवाड्यातील प्रश्नांना सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असून नव्या सरकारच्या येण्याने प्रश्न अधिक जलदगतीने सुटतील, असा विश्वास भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिला.

वांद्रे पश्चिम खारदांडा येथे कोळीवाड्यात आमदार अँड आशिष शेलार यांनी आज नारळी पौर्णिमा उत्सव आयोजित केला होता. पारंपरिक कोळी गीतांच्या ठेक्यावर वाजतगाजत विधीवत दर्याला नारळ अर्पण करून समुद्राची पुजा यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आली.

कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व असून वाजतगाजत दर्र्याला नारळ अर्पण करुन, बोटींची पुजा करुन मच्छीमार बांधव आपली बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी निघतात. याचे औचित्य साधून आमदार अँड आशिष शेलार यांनी प्रसिद्ध गायक योगेश आग्रावकर यांच्या कोळी गितांचा कार्यक्रम आयोजित केला होता. कोळी बांधव- भगिनींनी या कोळीगीतांच्या ठेक्यावर फेर धरताच अवघा कोळीवाडा ‘जय मल्हार’ च्या घोषणेत
दुमदुमून गेल्याचे चित्र होते.

Exit mobile version