हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे श्रीरामांनीच ठाकरेंकडून धनुष्यबाण हिसकावून घेतला ; रवी राणा

हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे श्रीरामांनीच ठाकरेंकडून धनुष्यबाण हिसकावून घेतला ; रवी राणा

शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातली लढाई निवडणूक आयोगात पोहोचली. त्यानंतर आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नावच गोठवलं आणि दोन्ही गटांना नवी नावं आणि चिन्हं सादर करण्याचे आदेश दिले. आता या नव्या चिन्हांवरुन पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच राणा दाम्पत्य उद्धव ठाकरे बरोबरचे जुने वाद उकडून काढत आहे. हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे श्रीरामांनीच ठाकरेंकडून धनुष्यबाण हिसकावून घेतला असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

हेही वाचा : 

Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. हनुमान चालिसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांच्या माध्यमातून जेलमध्ये टाकलं. राजद्रोहासारखा गुन्हा दाखल केला आणि हनुमान चालिसेचा विरोध केल्यामुळेच आज उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण हे चिन्ह श्री राम भगवंतांनी हिसकावून घेतलं आहे. उद्धव ठाकरेंना शिक्षा मिळाली आहे. त्यांनी १४ दिवस एका महिलेला जेलमध्ये टाकलं, म्हणून श्री राम भगवंतांनी आणि हनुमानांनी त्यांना शाप दिलेला आहे. त्यामुळे त्यांचं धनुष्यबाण चिन्ह गोठलेलं आहे. असे राणा यांनी म्हटले आहे.

शिवीगाळ वगैरे काहीच झालं नाही, तिथे फक्त… ; अब्दुल सत्तारांनी दिलं स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला आहे. त्यामुळे शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची अधिक शक्यता आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले आहे. आता, निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Mulayam Singh Yadav Died : मुलायमसिंह यादव आणि अमिताभ बच्चन यांच्यातील मैत्रीचे काही खास किस्से

Exit mobile version