spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Kesari : राज्यात ‘राजकीय कुस्तीचा’ सामना रंगणार, ठाकरेंना विरोध करणारा युपीचा खासदार महाराष्ट्र दौऱ्यावर

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसात महाराष्ट्रात येणार आहेत. येत्या २० डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध ब्रिजभूषण सिंह असा सामना आता रंगू शकतो.

मे २०२२ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आयोजित केला होता. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात जे आंदोलन केलं होतं, त्यासाठी आधी समस्त उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागा, अशी भूमिका उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती. राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशात आले तर ते सहि सलामत परतू शकणार नाहीत, असे आव्हान ब्रिजभूषण सिंह यांनी दिलं होतं. एकिकडे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरु असताना ब्रिजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशात राज ठाकरेंना दिलेल्या आव्हानाची तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती. ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून वारंवार दिली जाणारी आव्हानं पाहून राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता. मात्र आता महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेला ब्रिजभूषण सिंह येणार आहेत.

हेही वाचा : 

Bigg Boss Marathi 4 : मिरचीची धुरी, पाणी, तेल… टास्कमध्ये होणार खुल्ला राडा!

ब्रिजभूषण सिंह आणि कुस्ती

मातीतला पैलवान अशी आवड असलेल्या ब्रिजभूषण यांनी बालपणी अयोध्या आणि परिसरातले आखाडे गाजवले. कुस्तीचा छंद त्यांनी कायम ठेवला. राजकारणात आल्यानंतरही ते पुढे १० वर्ष भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष राहिले. कट्टर हिंदू असलेले बृजभूषण यांनी २००९ ला पक्षाला चक्रावून सोडणारा निर्णय घेतला होता. त्यांनी थेट भाजपला रामराम ठोकला आणि ते समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. पण तिथे त्यांचं जास्त काळ मन रमलं नाही. ते पुन्हा भाजपात परतले. उत्तर प्रदेशातल्या गोंडा, बलरामपूर या मतदारसंघांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. गोंडा हा तर त्यांचा बालेकिल्लाच. सध्या ते केसरगंज या मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा गोंडा सदर या मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलाय.

CM Eknath Shinde : राजकारणातून ब्रेक घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरीच्या भूमिकेत

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पुणे राष्ट्रीय तालीम संघाकडे देण्याबाबत निर्णय या समितीने घेतला. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. बाळासाहेब लांडगे यांच्या भूमिकेवर भारतीय कुस्ती महासंघाने आक्षेप घेतला आहे. बाळासाहेब लांडगे हे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सचिव नाहीत. त्यांची कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं ते आयोजन करताहेत अशी माहिती मिळत आहे. त्यांनी भरवलेल्या स्पर्धेत कुस्तीपटुंनी सहभागी होऊ नये अशा आशयाचं पत्रक भारतीय कुस्ती महासंघानं काढलं आहे.

तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या, तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे… ; नितीश राणे

Latest Posts

Don't Miss