spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चंद्रकांत पाटलांच्या समर्थनासाठी पुण्यात भाजपा रस्त्यावर

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), महात्मा फुले (Mahatma Phule) आणि कर्मवीर भाऊराव (Karmaveer Bhaurao Patil) पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळं अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. तर काल सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी आंदोलन करून पाटील यांचा निषेध केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येच (Pimpri-Chinchwad) त्यांच्यावर शाईफेकीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आज भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुणे जिल्हाधिकारी (Collector of Pune)कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळेच काल पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्या ऐन तोंडावर शाई फेकून त्यांना धक्काही देण्यात आला. पुणे (Pune) भाजपच्या वतीने आज या घटनेचा आज निषेध करण्यात आला.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हे आंदोनल करण्यात आलं. आंदोलक कार्यकर्त्यांनी हातामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे फलक घेतले होते. महापुरुषांचा जयजयकार कार्यकर्त्यांनी केला. तर शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनामध्ये आमदार, नगरसेवक आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा : 

हिमाचलमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, निर्भया पथकाच्या गाड्या बंडखोर आमदारांच्या ताफ्यात

ठाण्यातील आंबेडकर चळवळीतले अॅड. दीपक गायकवाड यांचा ठाकरे गटात प्रवेश

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss