शिंदे गटातील मंत्र्यांना भाजपचा विरोध ?

अखेर काल ९ ऑगस्ट रोजी शिंदे फडणवीस सरकारचा तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) हा झाला.

शिंदे गटातील मंत्र्यांना भाजपचा विरोध ?

मुंबई :- अखेर काल ९ ऑगस्ट रोजी शिंदे फडणवीस सरकारचा तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) हा झाला. परंतु हा विस्तार तर झाला पण हा विस्तार होण्याआधी पडद्यामागे अनेक घडामोडी या घडल्या आणि त्या आता हळू हळू समोर येऊ लागल्या आहेत. शिंदे गटातील दीपक केसरकर (Deepak Kesarkar), अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संजय राठोड (Sanjay Rathod) या तीन मंत्र्यांच्या नावाला भारतीय जनता पार्टी विरोध करत होती अशी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला माहिती मिळावी आहे. ता तीन नेत्यांच्या म्णात्रिमंडळातील समावेशाला भाजपने विरोध केला होता अशी माहिती समोर आली आहे. परंतु या सर्व संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची ठाम भूमिका ठेवली म्हणून दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या तीन नेत्यांना मंत्रिमंडळ समावेशाचा मार्ग हा मोकळा झाला आहे.

४० दिवसांपासून रखडलेला शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी दि ९ ऑगस्ट रोजी पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण २० जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता हि मोठ्या प्रमाणात वर्तवली जात होती. परंतु त्यानंतर दोघांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

नांदेडला येण्याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरुन दीड ते पावणे दोन तास चर्चा झाली. त्यावेळीच ही खलबतं झाल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीनीला मिळाली असे समोर आले आहे. तीन नावांना भाजपचा विरोध होता. त्यातील पहिले नाव हे दीपक केसरकर यांचे होते. बंडखोरीनंतर केसरकर यांची वक्तव्ये ही शिंदे आणि ठाकरे यांच्यातील दुरावा कमी करणारी होती. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांना विरोध असो वा ठाकरेंविरोधात बोलून नये अशी आपल्याच पक्षातील नेत्यांना केलेली सूचना असेल तसंच राणे यांच्यासोबतचा वाद कमी होत नव्हता. राणेंबाबत कमी बोलावं, आणि जुळवून घ्यावं असं सांगण्यात आलं. त्यानंतर भाजपचा विरोध काहीसा कमी झाला. तर अब्दुल सत्तार यांची वादग्रस्त वक्तव्यं आणि टीईटी घोटाळ्यात आलेलं नाव यामुळे भाजपने त्यांच्या नावाला विरोध केला होता असं कळतं. याशिवाय ज्यांच्यावर आरोप केले त्या संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्यासही भाजपकडून विरोध होता असं कळतं. पण आमचे मंत्री आम्हाला ठरवू द्या अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याने या तिघांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा मार्ग मोकळा झाला.

हे ही वाचा :- 

Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटपाची संभाव्य यादी झाली जाहीर…

Exit mobile version