भाजपने काँग्रेसवर केली सडकून टीका, एक ट्विट अन् पाच सवाल…

आज दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. काँग्रेस पक्षाचा हा १३९ वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त नागपुरात काँग्रेसकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

भाजपने काँग्रेसवर केली सडकून टीका, एक ट्विट अन् पाच सवाल…

आज दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. काँग्रेस पक्षाचा हा १३९ वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त नागपुरात काँग्रेसकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर आता या कार्यक्र्मावरून भाजपकडून टीका करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नागपूर येथे होणाऱ्या महारैलीसाठी साताऱ्यातील कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६०० हून जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसेसमधून नागपुरकडे रवाना झाले आहेत. तर या संदर्भातील एक काँग्रेसकडून व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यांच्या या कार्यक्रमावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे.

काँग्रेस कडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसचं कार्य अन् काँग्रेसचा विचार यावर या वर भाष्य करण्यात आलं आहे. “हम संघर्ष, त्याग, तपस्या और बलिदान हैं। इस देश से मोहब्बत करने वाले करोड़ों भारतीयों का स्वाभिमान हैं। हम हैं कांग्रेस”, असं ट्विट काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. या ट्विटवर आता महाराष्ट्र भाजकडून ट्विट करत टीका करण्यात आले आहे. तसंच भाजपने काँग्रेसला पाच सवाल विचारलेत. भाजपने एक पोस्टर शेअर केलंय. पुन्हा हारण्यासाठी तुमचं स्वागत आहे…, असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलंय. मोहब्बत करप्शन की दुकान खोलने के लिए स्वागत है आपका… काँग्रेस वर्धापन दिन नागपूर…, असं या पोस्टरवर म्हणण्यात आलं आहे. काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?, असा सवाल भाजपने काँग्रेसला केला आहे. भाजपचे ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसला थेट पाच सवाल विचारले आहेत. नागपुरातील रॅलीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

काँग्रेसला सवाल विचारणारं भाजपचं ट्विट काय?

काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?

१) हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

२) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

३) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली साडे तीनशे कोटींची रोकड अवैध मार्गानं कशी मिळवावी हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

४) मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

५) घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?

हे ही वाचा:

‘Vd 18’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान वरुण धवणच्या पायाला दुखापत

अ‍ॅनिमलच्या यशानंतर तृपी डिमरी करणार कार्तीक आर्यनसोबत स्क्रीन शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version