Sanjay Raut : भाजपनेही भारत जोडो यात्रेचं स्वागत करावं, राऊतांचं आवाहन

Sanjay Raut : भाजपनेही भारत जोडो यात्रेचं स्वागत करावं, राऊतांचं आवाहन

शिवसेना खासदार संजय राऊत जामिनानंतर तुरुंगाबाहेर आल्यावर अधिक आक्रमक दिसतील असा अंदाज बांधला जात असतानाच प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसलं. राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं आणि कटुता संपवण्याची भाषा केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार संजय राऊतांनी सांगितलं.

१०३ दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी सर्वप्रथम सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. शिवतिर्थवर जाऊन स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. त्यानतंर काल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा : 

अफझल खान कबरप्रकरणाचा वाद सुप्रीम कोर्टात, कबरीभोवतलच्या अतिक्रमणावर सरकारने केलेल्या कारवाईविरोधात याचिका

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का असा प्रश्न माध्यमांनी विचारता, संजय राऊत यांनी प्रकृतीमुळं अद्याप निश्चित नसल्याचं म्हटलं. मात्र, भारत जोडो यात्रा ही कटुता संपवून प्रेमाचा संदेश देणारी यात्रा आहे. त्यामुळे, भाजपनेही भारत जोडो यात्रेचं स्वागत करायला हवं, भारत जोडो यात्रा ही कोणाविरुद्ध नसून राष्ट्रीय एकता, एकात्मतेचं ते आंदोलन आहे. देशातील कटुता, द्वेषभावना नष्ट होण्यासाठी सुरू झालेली यात्रा असून भाजपनेही या यात्रेचं स्वागत करायला हवं. कारण, या यात्रेचं काही चुकीचं असल्याचं मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी साधताना म्हटले.

Raigad Pen : पेणजवळ आढळला डमी बॉम्ब, ४ तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी

तत्पूर्वी राऊत यांनी कारागृहातून सुटल्यानंतर आपल्याला कारागृहात टाकण्याची देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राऊत भाजपवर जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होते. मात्र राऊत यांची भाषा मवाळ झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Sanjay Raut : संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

Exit mobile version