बडा कब्रस्तान प्रकरणात भाजपचा शिवसेनेवर निशाणा, देवेंद्र फडणवीसांचा फोटो समोर आणत सेनेचा पलटवार

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातबडा कब्रस्तानचे प्रकरण खूप जास्त गाजत आहे. त्यात आता राजकीय पक्षांनी देखील सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे.

बडा कब्रस्तान प्रकरणात भाजपचा शिवसेनेवर निशाणा, देवेंद्र फडणवीसांचा फोटो समोर आणत सेनेचा पलटवार

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बडा कब्रस्तानचे प्रकरण खूप जास्त गाजत आहे. त्यात आता राजकीय पक्षांनी देखील सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपाच्या नेत्यांकडून आता एक नवा व्हिडीओ जारी केला आहे. मुंबईच्या माजी महपौर किशोरी पेडणेकर यांनी महापौर असताना याकूब मेमनचे नातेवाईक रऊफ मेमन सोबत बडा कब्रस्तान येथे बैठक झाल्याचा मोठा आरोप भाजपाने केला आहे.

तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि टायगर मेमन, दाऊदच्या संबंधाच्या चौकशीची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेमन याचा फोटो ट्वीट केला. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे असे टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील दिसत आहेत. तर आता काँग्रेसने देखील या वादात उडी घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि रऊफ मेमन यांचा फोटो शेअर करत सावंत यांनी रऊफ मेमन ते हेच का? असा प्रश्न केला आहे.

हे ही वाचा:

याकूब मेमन देशद्रोही कसा बनला

समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था सरसावल्या, अमित ठाकरे सह सेलेब्रिटींनीही घेतला पुढाकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version