spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपाने महाराष्ट्रच्या हिताचाच निर्णय घेतला; आशिष शेलार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधतांना हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आहे असं सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र परदेश अध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी वरिष्ठांशी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून प्राप्त परिस्थिती मध्ये महाराष्ट्र हिताचा जो निर्णय घेतला आहे त्याला पूर्ण जनतेचं समर्थन आहे. हा घेतलेला निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी शिरसावंत केलं आहे आणि यावर मी वेगळा भाष्य करण्याची गरज नाही असं आशिष शेलार यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाने घेतलेली भूमिका महाराष्ट्रच्या संस्कृतीला, परंपरेला उच्च स्तरावर घेण्याचा एक भाग आहे. स्वतः मुरजी पटेल यांनी सुद्धा त्याबद्दलची कारवाही केली आहे. मी समस्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो पक्ष सर्वोतरी निर्णय आपण करतोच, आपली ऊर्जा राखून ठेवा दोन महिन्यामध्ये किंवा लगेच येणाऱ्या महानगर पालिकेमध्ये त्याचा उपयोग आपण नक्की करू. असं मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.

अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजप-शिंदे गट युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माध्यमांशी बोलताना आपण पक्षाच्या आदेशाचं पालन करु असं स्पष्ट सांगितलं. तसेच, मी एकदम खूश आहे आणि पक्षाचा आदेश मानणार आहे. त्यावर तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार का? असं विचारल्यावर मुरजी पटेल यांनी अजिबात नाही… अजिबात नाही… असं म्हणत आपण पक्षाच्याच आदेशाचं पालन करणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

हे ही वाचा :

Raj Thackeray: भाजपच्या मतपरिवर्तनानंतर राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार

Andheri By-election 2022 : निवडणूक बिनविरोध लढवण्याच्या निर्णयावर प्रभाव कोणाचा? ठाकरे की पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss