कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने  घेतला ‘हा’  मोठा निर्णय

पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी (Bypoll Election) राज्यातील सर्व पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे स्वतः पुणे दौरा करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याच अजून एक कारण म्हणजे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून भाजपच्या विरोधात तगडं आव्हान उभं करण्यात आला आहे. म्हणूनच भाजपने सुद्धा त्यांची पूर्ण ताकद लावण्याचे दिसून आले आहे. कारण आतापर्यंत ब्राह्मण समाजाचा उमेदवार उभा राहायचा, त्यामुळे कसब्यात भाजपची सत्ता असायची. यावेळी उमेदवार ब्राह्मण समाजाचा नाही. म्हणून या वेळेस महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे. त्या 26 फेब्रुवारी रोजी या दोन्ही ठिकाणांवर मतदान पार पडणार आहे. म्हणून या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळपासून कसब्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.

काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस (Devendra Fadnavis) हे काल पुण्यातील कसबा येथे गेले होते. काल कसब्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली जवळपास सात तास बैठका पार पडल्या आहेत. त्यामुळे कसब्यासह चिंडवडची जागा जिंकण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.येत्या १९ आणि २० तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यापाठोपाठ राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) हे २६ तारखेपर्यंत म्हणजे निवडणूक होईपर्यंत पुण्यात तळ ठोकून असणार आहेत. या सर्वांमध्ये कसब्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काल फडणवीसांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता स्वतः गिरीश बापट हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे आजरी आहेत. पण आजारी असूनही गिरीश बापट हे कसबा आज पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरणाची शक्यता वर्तवली जात आहे , संध्याकाळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बापट मार्गदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच केसरी वाड्यात होणाऱ्या कार्यक्रमात बापट स्वतः हजर राहून किंवा ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे. कसबा निवडणुकीसाठी बापटांचे मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जात आहे.

हे ही वाचा : 

जितेंद्र आव्हाड यांनी एक विडिओ शेअर करत महेश आहेर यांच्यावर केले गंभीर आरोप

जितेंद्र आव्हाड यांनी एक विडिओ शेअर करत महेश आहेर यांच्यावर केले गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version