spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कर्नाटकात स्वबळावर विधानसभा लढवून भाजप पुन्हा सरकार बनवेल, अमित शहांची घोषणा

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक येत्या मे महिन्यापर्यंत होण्याची शकता आहे. ही निवडणूक भाजप स्वबळावर लढेल तसेच कर्नाटकात पुन्हा भाजप आपलं सरकार स्थापन करेल अशी घोषणा अमित शहा यांनी केली आहे.

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक येत्या मे महिन्यापर्यंत होण्याची शकता आहे. ही निवडणूक भाजप स्वबळावर लढेल तसेच कर्नाटकात पुन्हा भाजप आपलं सरकार स्थापन करेल अशी घोषणा अमित शहा यांनी केली आहे. बंगलोरमध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये बोलताना अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी जेडी (एस) युतीबाबत देखील अफवा पसरवत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस वर देखील टीकास्त्र सोडले आहे.

बंगलोरमध्ये आयोजित जाहीर सभेला संबोधताना अमित शहा म्हणाले,”काही लोकांकडून जेडी(एस) आणि भाजप युती करणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. जेडी(एस) ला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल आणि पुन्हा सरकार बनवेल”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचा देखील सल्ला दिला आहे.

जेडी(एस) सोबतच अमित शहा यांनी काँग्रेसवर देखील टीका केली आहे.”काँग्रेसला सत्ता केवळ भ्रष्टाचारासाठी हवी आहे. मात्र, आम्ही सत्तेचा वापर जनकल्याणासाठी करतो. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी करतो. त्यामुळेच गेल्या काही दिवसात झालेल्या ७ राज्यातील निवडणुकीमध्ये काँग्रेसला ६ राज्यात पराभव स्वीकारावा लागला आहे”, असे अमित शहा यांनी म्हंटले आहे. तत्पूर्वी अमित शहा यांनी बूथस्थरावरील कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते.

हे ही वाचा:

एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा सांभाळणार IAF च्या वेस्टर्न एअर कमांडची कमान

एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा सांभाळणार IAF च्या वेस्टर्न एअर कमांडची कमान

नव्या वर्षात बसणार महागाईचा फटका वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतक्या रुपयांनी महागला सिलेंडर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss