Gujarat- Himachal Election Result 2022 गुजरातमध्ये विजय पक्का, तर हिमाचलमध्ये भाजपला मोठा धक्का, कोण मारणार बाजी?

Gujarat- Himachal Election Result 2022 गुजरातमध्ये विजय पक्का, तर हिमाचलमध्ये भाजपला मोठा धक्का, कोण मारणार बाजी?

गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे कल स्पष्ट झालेले आहेत. भाजप ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे. गुजरातमध्ये आजवर भाजपला एवढं यश कधीही मिळालं नव्हतं. दुपारी १२ वाजेपर्यंत भाजप १५२ जागांच्या पुढे सरकला आहे. तर काँग्रेस २० वर आहे. मतमोजणी सुरु होतच हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, सातत्यानं हिमाचलमधील कल बदलत आहेत. सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. त्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे.

हेही वाचा : 

Gujarat Election Result गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांकडून विजयी पताका

तर गुजरातमध्ये हिमाचलमध्ये असलेल्या स्थितीविरुद्ध घडलं आहे. भाजपाने गुजरातमध्ये काँग्रेसची कंबर तोडली आहे. भाजपा गेल्यावेळपेक्षा ५६ जागा पुढे आहे, तर काँग्रेस ६० जागा नुकसानित आहे. एवढे मोठे यश १९९५ पासून सत्तेत असलेल्या भाजपाला पहिल्यांदाच मिळाले आहे. गेल्या वेळी भाजपाला ९९ आणि काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. यामुळे यावेळी काँग्रेसला टक्कर देण्याची आशा होती. परंतू आपला मतदान मोठ्याप्रमाणावर झाल्याने काँग्रेसचे मनसुबे उधळले गेल्याचे दिसत आहेत.

काँग्रेसच्या गुजरातमधील पराभवाची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेसकडे चेहरा नव्हता. काँग्रेसकडे स्टार कँम्पेनरही नव्हता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमध्ये मोजक्याच सभा झाल्या. ते भारत जोडो यात्रेत सहभागी होते. प्रियंका गांधी यांच्याही सभा झाल्या नाहीत. आजारपणामुळे सोनिया गांधीही गुजरातकडे फिरकल्या नाहीत. त्याशिवाय काँग्रेसचे इतर नेते गुजरातमध्ये प्रभाव पाडू शकले नाहीत.

Dharmendra Happy Birthday : केवळ ५१ रुपयांचे मानधन स्वीकारून ‘या’ अभिनेत्यानं चित्रपटसृष्टीतील प्रवास केला सुरु

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी १०,००० सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणी सुरु आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत ६८ जागांसाठी एकूण४१२ उमेदवार रिंगणात आहेत. हिमाचलच्या ६८ सदस्यीय विधानसभेसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. सुमारे ७६.४४ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

Exit mobile version