spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज; ‘देवा भाऊ देवा भाऊ’…या गाण्याने प्रचाराचा प्रारंभ

माझी लाडकी बहीण योजनेचे श्रेय दाखवण्यासाठी भाजपकडून जाहिरातीच्या मार्फत प्रचार केला जात आहे. त्यासाठी बहिणींचा भाऊ 'देवा भाऊ' या गाण्यांमार्फत जाहिरात करण्यात आली आहे. महिलांना १५०० रुपये देणाऱ्या देवा भाऊला फडणवीस यांच्या समर्थकांकडून गाणे तयार करण्यात आले.

एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले आहे तर दुसरीकडे भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्व सूत्र देवेंद्र फडणवीस (Devedra Fadnavis)च सांभाळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. लाडकी बहीण योजनेचे श्रेय महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते देत आहेत. शिंदे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना श्रेय देत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार (Ajit Pawar) यांना दिले जात आहे. हे दोन्ही पक्ष पुढे असताना भाजप कार्यकर्ते कसे मागे राहतील. माझी लाडकी बहीण योजनेचे श्रेय दाखवण्यासाठी भाजपकडून जाहिरातीच्या मार्फत प्रचार केला जात आहे. त्यासाठी बहिणींचा भाऊ ‘देवा भाऊ’ या गाण्यांमार्फत जाहिरात करण्यात आली आहे. महिलांना १५०० रुपये देणाऱ्या देवा भाऊला फडणवीस यांच्या समर्थकांकडून गाणे तयार करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची एका नामांकित प्रसार माध्यमाने जाहिरात घेतली होती. त्यावेळी त्यांना ‘देवा भाऊ’ असे लाडकी बहीण योजनेमुळे म्हणायला सुरुवात केली का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देवा भाऊ या नावाने मला आधीपासूनच काही जण बोलवतात. परंतु लाडकी बहीण योजनेनंतर ते जास्त प्रसिद्ध झाले. ‘देवा देवा, देवा भाऊ’ असे या गाण्याचे बोल आहेत. तर त्या गाण्यात रामभक्त आणि शिवभक्त म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा  उल्लेख केला गेला आहे. तसेच या गाण्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबविल्या आहेत या संदर्भातील माहिती या गाण्याच्या माध्यमातून दाखविली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या तुफान गाण्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारडं किती जड ठरणार आहे हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा संदर्भ घेऊन आता शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून प्रचाराचे कोणते गाणे वाजवले जाईल याची उत्सुकता सर्वांना लागून आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा, काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी

धारावीत मशिदीचा काही भाग पाडल्याच्या विरोधात लोक रस्त्यावर, बीएमसीच्या वाहनाची तोडफोड, परिसरात तणाव…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss