भाजपचं मिशन मुंबई पण पंकजा मुंडे अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण

भाजपचं मिशन मुंबई पण पंकजा मुंडे अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आल्यापासून भाजपच्या मुंबई मिशनला चांगलाच जोर आलाय. अमित शाह मुंबईत आल्यापासून त्यांनी लालबागच्या राजाचे आणि भाजपच्या विविध नेत्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात अमित शाह यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी महत्त्वाच्या बैठकी घेऊन रणनिती आखली आहे, पण आश्चर्याची बाब म्हणजे या सगळ्या बैठकींमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) मात्र गायब दिसल्या.

अगदी काहीवेळातच अमित शाह दिल्लीला रवाना होणार आहेत. पण त्याआधीसुद्धा भाजपाची एक महत्तवाची बैठक होणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, पूनम महाजन, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर, संभाजीराव निलंगेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर, अतुल सावे, विनोद तावडे हे नेते हजेरी लावणार आहेत.पण याआधी घेतलेल्या सर्व बैठकांना गैरहजर राहिल्यामुळे पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तांतर होऊन शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांचं सरकार आलं तेव्हा पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार का नाही, याबाबत चर्चा सुरू होत्या, पण मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंकजा यांना संधी मिळाली नाही. मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यालादेखील पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. मंत्रिपदाची संधी न मिळाल्याबद्दलही पंकजा मुंडेंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी ‘तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेची लोक असतील, जेव्हा माझी पात्रता वाढेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

हे ही वाचा:

सर्वोच्चन्यायालयाच्या नोटीसमुळे राजकीय पक्ष सापडणार ‘धर्मसंकटात’

किशोरी पेडणेकरांनी अमित शहांना दिले उत्तर म्हणाल्या आम्ही तुम्हाल जमिनीवर आणू…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version