spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेना संपवण्याचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदेंचा वापर – सुषमा अंधारे

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश केल्या बरोबर शिवसेनेकडून सुषमा अंधारे यांना शिवसेना उपनेते पद दिले गेले. आज माध्यमांशी बोलतांना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. ज्या झाडाने सावली दिली, ज्याची फळे चाखली, त्याच झाडावर घाव घालताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला काहीच वाटलं नाही का? असा प्रश्न शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. निवडणूक आयोगाने शिनसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजयकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सुषमा अंधारे यांनी यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केलीय.

ज्या झाडांनी तुम्हाला सावली दिली, ज्या झाडाची फळे चाखलीत, ज्या झाडाने तुम्हाला इतकं काही दिलं त्या झाडावर घाव घालताना शिंदेजी तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही, असा प्रश्न अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलाय. सध्या मेरी लाठी मेरी बैसे असा प्रकार चालू आहे. आपल्याला अनुकल असणारे निर्णय घेतले जात आहेत. अंधेरी निवडणुकीमुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, तुम्ही खरचं शिवसेना वाचवण्यासाठी निघाला असाल तर जी जागा मूळ शिवसेनेची आहे ती भाजपासठी कशी सोडलीत? शिंदे गटाने ती जागा का लढवली नाही? असे प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केलाय.

भाजपने शिवसेना संपवायला लावली आहे असा आरोप करत सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसेना संपवण्याचा प्लॅन सक्सेस करण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदे यांचा वापर केला जात आहे. प्लॅन यशस्वी झाल्यावर शिंदेंना देखील भाजपकडून संपवले जाईल. एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांना उद्धव ठाकरे पक्षात परत घेतील का यावर देखील सुषमा अंधारे यांनी आपले मत व्यक्त केले. मातोश्री नाव आहे. आई सर्वांना प्रेमाने जवळ घेते, परंतू या सर्वांनी एवढं अती वागायचं ठरवलंय, त्यामुळे अती तेथे माती असं खोचक वक्त्यव अंधारे यांनी यावेळी केलं आहे.

हे ही वाचा:

खैरे हे महिलांना रात्री फोन करायचे आणि बघा आम्हाला मतदान केले नाही तर… – संजय शिरसाट

Uddhav Thackeray Live : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे लाईव्ह

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss