spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बोगस शपथपत्राप्रकरणी उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली हजारो शपथपत्रे बनावट असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. बोगस शपथपत्राप्रकरणी गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) दिलेली शपथपत्र बोगस नसल्याचं गुन्हे शाखेनं म्हटलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारी अनेक शपथपत्र बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठी उलथापालथ झाली आहे. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षासह चिन्हावरही दावा करण्यात आला होता. आमचीच खरी शिवसेना असून आम्हाला पक्ष व चिन्ह आम्हाला मिळावं, असं शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे म्हटलं होतं. निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. मात्र, शिंदे गटाने ठाकरे यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा दावा केला होता. ठाकरे गटाची जवळपास साडेचार हजार प्रतिज्ञापत्र ही बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवून आपला तपास सुरू केला होता. कोल्हापूरसह नाशिक, पालघर, अहमदनगर यासारख्या राज्यात पोलिसांची पथक दाखल झाले होते व तपास करण्यात येत होता.

या चौकशीत असता शपथपत्रांसंदर्भात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आलंय. ‘गेले तीन दिवस आम्ही ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्या प्रत्येकाला समक्ष बोलवून त्यांची विचारपूस केली होती. त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे की नाही याची खात्री केली. त्यावेळी सर्वांनीच ते शपथपत्र दिलं आहे असं आमच्या जबाबात सांगितलं आहे’, असं गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत खिशाला झळ ! फटाक्यांच्या दारात देखील वाढ

T20 World Cup In Marathi : मनसेच्या इशाऱ्यानंतर राज ठाकरेंना भेटणार ‘स्टार’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss