बॅालीवूडलाही ‘महासत्तांतर’ची भुरळ, राम गोपाल वर्मा अॅक्शन मोडमध्ये

निर्माते राम गोपाल वर्मा यांनी राज्यातील सत्तांतरावर नुकतंच बाजारात आलेल्या 'महासत्तांतर' या पुस्तकाचं कौतुक केलं आहे.

बॅालीवूडलाही ‘महासत्तांतर’ची भुरळ, राम गोपाल वर्मा अॅक्शन मोडमध्ये

सत्या,कंपनी, डेंजर्स, सरकार, आणि सरकार राज असे एकापेक्षा एक धमाकेदार चित्रपट बॉलीवूडला देणारे चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी राज्यातील सत्तांतरावर नुकतंच बाजारात आलेल्या ‘महासत्तांतर’ या पुस्तकाचं कौतुक केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर यांनी लिहिलेल्या आणि इंकिंग इनोवेशनच्या आनंद लिमये यांनी प्रकाशित केलेल्या महासत्तान्तर या पुस्तकात राज्यात शंभर दिवसांपूर्वी बनलेल्या सरकारचा सत्तापालट शब्दबद्ध करण्यात आलेला आहे.

राम गोपाल वर्मा यांनी बनवलेला सरकार हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला होता या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तिरेखेमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं त्यामुळे संपूर्ण देशाला अचंबित करणाऱ्या राज्यातील महासत्तांतरावर आता चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये ‘आरव्हीजी’ नावाने ओळखले जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तांतरावर चित्रपट बनवणार का याकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

पुस्तकाची माहिती संक्षिप्त रूपात :

देशाच्या राजकारणात भूकंप घडवणारं महासत्तांतर जून महिन्यात राज्यात घडलं. या सत्तांतरानंतर ५६ वर्षाच्या शिवसेनेत न भूतो अशी उभी फूट पडली. पक्षाचे सर्वेसर्वा असलेले पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे अवघ्या काही तासात खुर्चीवरून पायउतार होत घरी परतले. या महासत्तांतरातल्या पडद्यामागच्या अनेक गोष्टी आणि तपशील या प्रसार माध्यमांच्या किंवा वृत्तवाहिन्यांच्या नजरेस पडू शकल्या नाहीत. अशा अनेक गोपनीय आणि धक्कादायक गोष्टी सत्तेच्या चक्रव्यूहात थेट घुसून वाचकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न महासत्तांतर या पुस्तकातून करण्यात आलेला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘इंकिंग इनोवेशन’च्या आनंद लिमये यांनी हे अत्यंत धाडसी पुस्तक वाचकांच्या भेटीला आणलेलं आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले… ; नाना पटोले

KBC 14 Birthday Special : केबीसीच्या मंचावर जया बच्चन नेमकं काय बोलल्या?, ज्यामुळे बिग बी रडले, पाहा व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version